Sunday, November 17, 2024

/

सुरेश अंगडी यांना पंतप्रधानांसह मान्यवरांनी अशी वाहिली श्रद्धांजली

 belgaum

सलग चारवेळा खासदारपदी निवडून आलेल्या आणि रेल्वे राज्यमंत्रिपदी वर्णी लागलेल्या सुरेश अंगडी यांचे आज दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता हि बेळगावकरांसाठी धक्कादायक ठरली. ५८ वर्षांचे सुरेश अंगडी हे कोरोनावरील उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. उपचाराचा परिणाम न होता त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याची निधनाची वार्ता समजताच पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश अंगडी यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. सुरेश अंगडी हे एक निष्ठावान कार्यकर्ते होते. कर्नाटकात पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. आपल्या पदाशी समर्पित असलेले खासदार आणि प्रभावी मंत्री असलेले सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही सुरेश अंगडी याना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. सुरेश अंगडी आपल्यातून निघून गेले यावर माझा विश्वास बसत नाही. आपल्या कार्यावर प्रामाणिकपणे परिश्रम घेणारे सुरेश अंगडी यांच्या जाण्याने नेहमी कमी जाणवेल, एका मौल्यवान सहकाऱ्याला आपण गमावल्याचे दुःख त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे.Modi angdi

Shri Suresh Angadi was an exceptional Karyakarta, who worked hard to make the Party strong in Karnataka. He was a dedicated MP and effective Minister, admired across the spectrum. His demise is saddening. My thoughts are with his family and friends in this sad hour. Om Shanti. https://t.co/2QDHQe0Pmj

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहिली असून सुरेश अंगडी हे उत्तम प्रशासक, प्रभावी व्यक्तिमत्व आणि अनुभवी खासदार होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर आलेल्या दुःखद प्रसंगात आपण सहभागी असल्याचे सांगत ट्विटरद्वारे त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Nirmala Sitharaman (@nsitharaman) Tweeted:
Hard to believe that Minister Suresh Angadi is no more. Painstaking at work, amiable and sincere, he was a valued colleague who shall be greatly missed. https://t.co/HtZcxBNbhN https://twitter.com/nsitharaman/status/1308798879668686851?s=20

 

सुरेश अंगडी हे नेहमीच बेळगावमधील एक उत्तम राजकारणी म्हणून परिचित होते. सलग ४ वेळा खासदारकी आणि रेल्वे राज्य मंत्रीपदी वर्णी लागलेल्या सुरेश अंगडींचे ९ सप्टेंबर रोजीचे रेल्वे राज्य मंत्रिपदीचे कार्य हे शेवटचे ठरले. देशभरात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेला अनंतपूर- नवी दिल्ली या रेल्वेला बेळगावच्या काडा कार्यालयातून त्यांनी हिरवा कंदील दाखविला होता. रेल्वे राज्यमंत्रिपदी असताना केलेले हे त्यांचे शेवटचे कार्य ठरले.

Rajnath Singh (@rajnathsingh) Tweeted:
Deeply saddened by the demise of Rail Rajya Mantri, Shri Suresh Angadiji.

He was a good administrator, seasoned Parliamentarian and blessed with a warm and affable personality. My heartfelt condolences to his family and supporters. Om Shanti! https://twitter.com/rajnathsingh/status/1308798984622764032?s=20

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन ही अतीशय धक्कादायक घटना आहे.चार वेळा खासदारकी मिळवूनही त्यांना अजिबात गर्व नव्हता .सामान्यातल्या सामान्य माणसाशीही ते अतिशय सौजन्याने वागत. त्यांच्या निघून जाण्याने बेळगावचे आणि संपूर्ण कर्नाटकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. मी एका चांगल्या मित्रास गमावलो आहे. अशा शब्दात मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

भाजप नेते किरण जाधव यांनीही सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. बेळगावकरांचे आधारस्तंभ होते त्यांच्या निधनाने निष्कलंक चारित्र्याच्या नेत्यास आम्ही मुकलो आहोत.

अनंत लाड,अध्यक्ष, घुमटमाळ मारूती मंदिर, हिंदवाडी,बेळगाव
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे भूषण असलेले श्री सुरेश अंगडी यांचे आज निधन झाले ही अतिशय धक्कादायक घटना आहे. त्यांच्या निधनाने एक स्वच्छ चारित्र्याच्या, चार वेळा खासदार होऊनही कसलाच गर्व नसलेल्या व्यक्ती ला गमावलो आहोत। हा मोठा माणूस आम्ही जवळून पाहिला होता .सुमारे 30 वर्षांपूर्वी श्री अंगडी हे जेव्हा बेळगाव ग्रामीण भाजपाचे अध्यक्ष झाले त्या वेळी माझी एका संस्थेवर निवड झाली आणि आम्हा दोघांचा सत्कार मच्छे येथील तरुणांनी केला होता. घुमटमाळ मारूती मंदिराच्या व बेळगाव जॉयट्स ग्रुपच्या कार्यक्रमात आम्ही अनेकदा भेटलो,सुनिल चौगुले हा त्यांचा कार्यकर्ता ,त्याच्या समवेत मी अंगडी जिना अनेकदा भेटलो होतो. मी दोडणावर हायस्कूल मधून निवृत्त झालो त्यादिवशी ते माझ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी माझे कौतुक केले होते. त्यांच्या निधनाने आम्ही एका उत्तम मार्गदर्शकास मुकलो आहोत त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना!-

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.