Thursday, January 2, 2025

/

बी. के. हरिप्रसाद म्हणजे देव नव्हे : राज्य कृषिमंत्री

 belgaum

बीजेपीचे नेते अमली पदार्थांचे सेवन करतात या खासदार बी. के. हरिप्रसाद यांच्या वक्तव्याला राज्य कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी ठोस प्रत्त्युत्तर दिले आहे. हरिप्रसाद जे बोलले तीच गोष्ट खरी असेल असे नाही, त्यांनी वक्तव्य योग्यच असायला ते ब्रम्हदेव नाहीत, अशी बोचरी टीका बी. सी. पाटील यांनी केली आहे. बेळगाव येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगावमध्ये अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. यासंदर्भात काही अभिनेत्यांनी राजकारण्यांची नावे घेतल्यामुळे अमली पदार्थ प्रकरण चांगलेच तापले आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरु असून आरोप- प्रत्यारोपांना ऊत आला आहे.

राज्यसभा खासदार बी. के.हरिप्रसाद नुकतेच बेळगावमध्ये दाखल झाले होते. त्यादरम्यान त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टोलेबाजी केली. “भाजपचे नेते दररोज अंमली पदार्थांचे सेवन करूनच घराबाहेर पडतात, केवळ सिलीब्रीटी, चित्रपट अभिनेते आणि व्यावसायिकच नव्हे तर नेतेही अमली पदार्थांचे सेवन करतात. भाजपचे अनेक नेतेही व्यसनाधीन आहेत” असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यावला आज राज्य कृषिमंत्री बी. के. पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले.

Bc patil
Bc patil mos agriculture belgaum visited monday

ते म्हणाले कि, भाजपचे नेते व्यसनाधीन आहेत हे जर आधीपासून हरिप्रसाद याना माहित होते तर इतके दिवस ते गप्प का होते? हरिप्रसाद काही बोलतील आणि ते शेवटचे वक्तव्य असायला ते ब्रम्हदेव नाहीत, त्यांनी बोललेले वाक्य म्हणजे वेद वाक्य नाही, हे सर्व हरिप्रसाद यांनी केव्हा पाहिले? आणि इतके दिवस कोणत्या गोष्टीची वाट पहात होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करण्याआधी त्यांनी विचार करावा आणि नंतरच अशी विधाने करावीत, असा सल्ला बी. के. पाटील यांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.