बेळगाव शहरात मांजामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. एका डॉक्टरचा यामध्ये जीवही गेला आहे. त्यामुळे आता बेळगाव शहर आणि परिसरात मांजा विकणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येत असून पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना माहिती देऊन मांजा विक्री करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. मांजा विक्रीची प्रक्रिया तीव्र झाली असून याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. नुकतीच गांधीनगर येथील ब्रिज जवळ एका युवकाच्या गळ्याला मांजा लागून तो जखमी झाला होता.
ज्योतिबा राजगोळकर असे त्याचे नाव आहे. त्याने माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करून मांजा विक्री करणार्यावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. याची दखल पोलीस आयुक्त के त्यागराजन यांनी घेऊन संबंधित पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. आता पोलीस अधिकारी मांजा विकणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
ज्या ज्या ठिकाणी मांजा विक्री करण्यात आली आहे त्याठिकाणी मांजा जप्त करून यापुढे असे घातक मांजा विक्री करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. मांजामुळे अनेक वेळा लहान-मोठे अपघात घडत आहेत. विद्युत तारांमध्ये मांजा अडकून वीजपुरवठा खंडित होत असल्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. मांजा विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून माळमारुती पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर धाड टाकून माझ्या जप्त केला आहे.
पतंग उडविण्यासाठी मुले मांजाचा वापर करतात. पतंग उडविताना ये-जा करणारे या मांजामुळे जखमी होत आहेत. याची दखल घेत पोलिसांनी मांजा विक्री करणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे अनेक आतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.