कर्नाटक-महाराष्ट्र बस सेवा सुरू कोरोना महामारी मुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. याला परिवहन महामंडळ ही अपवाद नाही. मागील सहा महिन्यांपासून कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा बंद होत्या. त्या मंगळवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
याआधी कर्नाटक गोवा बस सेवा सुरू झाल्या होत्या. मात्र महाराष्ट्रात पुन्हा लॉक डाऊन वाढविल्याने कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा बससेवा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बेळगाव आगारातून सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रात बसेस धावायला सुरू झाल्या आहेत.
परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून बसेस महाराष्ट्राच्या कोल्हापूर मुंबई पुणे नाशिक सांगली सातारा मिरज सोलापूर पंढरपूर तुळजापूर औरंगाबाद बार्शी आधी शहरांकडे रवाना झाल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र एसटी मंडळाच्या बस देखील कर्नाटकाच्या रामदुर्ग बैलहोंगल खानापूर संकेश्वर निपाणी चिकोडी गोकाक आगारात दाखल होणार आहेत. यामुळे परिवहन महामंडळाच्या खजिन्यात भर पडणार आहे.
या साऱ्या बस सुरू करण्यात आले असले तरी कोरोना नियमांचे पालन करूनच बस प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली बस सेवा सुरू करण्यात आली आहे. शेजारील राज्याच्या बससेवेला परवानगी मिळाली होती. मात्र कर्नाटक महाराष्ट्र बस सेवा सुरु नव्हती. याला मंगळवारी मुहूर्त सापडला आहे.
त्यामुळे या बस सेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. दोन्ही राज्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला असून आता महाराष्ट्र व कर्नाटकाच्या आगाराच्या खजिन्यात भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.