बेळगावच्या सांबरा विमानतळावर आज प्रवाशांची तपासणी करताना एका सैनिकाजवळ AK -४७ चे जिवंत काडतूस आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर या सैनिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याचे नाव नायब सुभेदार अरुण मारुती भोसले असे आहे
आज सकाळी सांबरा विमानतळावर सैनिकाजवळ गोळीबार केलेली काडतुसांची पट्टी आणि एक जिवंत काडतूस सापडले आहे. हा सैनिक दिल्लीवरून बंगळूरला आणि बंगळुरवरून बेळगावला विमानाने दाखल झाला होता.
या दरम्यान विमानतळावर तपासणीवेळी हे काडतूस पोलिसांनी हस्तगत केले असून पुढील तपासासाठी या सैनिकाला एमएलआयआरसीमध्ये दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी मारिहाळ पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.