दहावी पुरवणी परीक्षेचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा पेपर लिहिण्यासाठी विद्यार्थी केंद्रावर पोहोचले आहेत. तसे पाहता हा शेवटचा पेपर सोमवारी होणार होता. मात्र कर्नाटक बंदची हाक दिल्यानंतर हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. आता या शेवटच्या पुरवणी पेपराला सुरुवात झाली आहे.
विद्यार्थी केंद्रावर पोचले आहेत आणि कधी एकदा हा पेपर संपले असे त्यांना वाटू लागले आहे. विज्ञान विषयाच्या पेपरने परीक्षेचे सांगता होणार आहे. शैक्षणिक जिल्ह्यात अनुत्तीर्ण यांची संख्या अधिक असल्याने पुरवणी परीक्षेचा निकाल चांगला लावण्याचे आवाहन बेळगाव जिल्हा शिक्षण विभागात समोर ठाकले आहे.
मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आहेत. मध्यंतरी कोरोना काळात दहावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यानंतर त्या परीक्षा झाल्या आणि निकाल चांगले लागले. दरम्यान काही या परीक्षांमध्ये नापास होऊन आता पुन्हा पुरवणी परीक्षा देत आहेत. या परीक्षेची सांगता मंगळवारी दुपारी होणार आहे.
सोमवारी शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेदले होते. त्यामुळे ही परीक्षा मंगळवारी घेण्यात आली. आता या परीक्षेची सांगता होणार आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्र पोचून पेपर लिहिण्यास सुरुवात केली आहे. शेवटचा पेपर असल्याने अनेक जण आनंदी होत. असल्याचे दिसून येत आहे दुपारी या परीक्षेची सांगता होणार आहे.