मोठ्या उत्साहात पिरनवाडी येथील नवीन छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाचा नवीन नामफलक अनावरण करण्यात आला दोन्ही समाज बांधवांनी तो उदघाटन केला मात्र एक संघटनेच्या डोळ्यात तो फलक खुपसत आहे कारण फलक उदघाटन होण्याच्या काही वेळेतच कन्नड संघटनेने निवेदन देऊन सदर बेकायदेशीर आहे अस म्हंटल आहे.मराठीचा नेहमीच पोटशूळ असणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेने पिरनवाडी नामफलक प्रकरणी पुन्हा एकदा कोल्हेकुई सुरू केली आहे.
मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यावरून सुरू झालेला वाद सामोपचाराने मिटवण्यात आला. त्यानंतर बैठकीत या चौकाचे नाव छत्रपती शिवाजी चौकच असावे यावर दोन्ही समाजातील नेत्यांनी शिक्कामोर्तब केले.
परंतु त्यानंतर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि भाषिक वाद उफाळून आणण्याच्या दृष्टिकोनातून करवेच्या नारायण गौडाकडून संतापजनक वक्तव्य करण्यात आले. याचा निषेधही सर्वत्र करण्यात आला. परंतु करवेची कोल्हेकुई सुरूच असून आज पिरनवाडी यथे भव्य प्रमाणात अनावरण करण्यात आलेल्या नामफलकाबाबत करवेने गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे.
पिरनवाडी येथील फलक हा अनधिकृत असून यावर कन्नड भाषेला दुय्यम दर्जा देण्यात आल्याचे वक्तव्य करवेने केले आहे.
हा फलक दोन्ही समाजाने पुढाकार घेऊन तसेच ग्रामस्थांनी सर्वांच्या सहमतीने उभा केला आहे. परंतु सातत्याने उलट सुलट विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या करवेला नेमके काय साध्य करायचे आहे? याबाबत प्रश्नचिन्ह उभे करण्यात येत आहे.
पिरनवाडी परिसरात 60 टक्क्यांहून अधिक कन्नड भाषिक राहात असून या फलकावर कन्नड भाषेत प्रथम उल्लेख करावा अशी मागणी पंचायत विकास अधिकाऱ्यांकडे करवेने केली आहे.