पतंग उडविण्या वरून दोन गटात वादावादीचे प्रकार आणि त्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला आहे. बेळगाव येथे शनिवारी रात्री हा प्रकार घडला असून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पतंग उडविण्या वरून वादावादीचा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली.
कामत गल्ली आणि माळी गल्लीत तणाव निर्माण झाला आहे. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दाखल होऊन तणाव आटोक्यात आणला. या मारहाणीत दोघेजण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पतंग उडविन्यावरून दोन गटात झालेल्या वादावादी हाणामारी व त्यानंतर दगडफेकीमुळे कामत गल्ली व माळी गल्ली परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगवले. त्यानंतर जमाव ऐकत नसल्याने लाठीहल्ला करण्यात आला.
याबाबत पोलिसांची विचारले असता तसे काही घडले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र माळी गल्ली व कामत गल्ली परिसरात तणाव कायम होता. पोलिस बंदोबस्त नंतर त्यांना निवळला असला तरी या घटनेने पुन्हा एकदा शहर परिसरात दंगलीचे गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पतंग उडविणे यावरून हा तणाव निर्माण झाला आहे. याकडे आता पोलीस प्रशासन लक्ष देत असून पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न करत आहेत.