कोरोना महामारी मुळे मागील अनेक महिन्यांपासून आंतरराज्य बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र शुक्रवारपासून कर्नाटक गोवा बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक गोवा आंतरराज्यीय प्रवासी वाहतुक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक एम.आर. मुंजी यांनी दिली. वाहतुकीवरील निर्बंध हटविण्यात आल्याने बेळगाव गोवा मार्गावरील वाहतूक 4 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे 23 मार्चपासून बंद असलेली एसटी बसेसची प्रवासी वाहतूक शुक्रवारी 4 सप्टेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाच महिन्यानंतर राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस धावणार आहेत.
प्रवाशांना कोणत्याही ई – पासची गरज राहणार नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परिवहन महामंडळाने परवानगी दिल्याने अनलॉक चौथ्या टप्प्यात आंतरराज्य बस सेवा सुरू होत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी कोरोना नियमांचे पालन करून प्रवास करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.