मागील दीड वर्षापासून रेंगाळत असलेल्या रस्ते कामाला कंग्राळी खुर्द येथे पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. कंग्राळी खुर्द रोड वरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे तर काहीजण स्वयंस्फूर्तीने हे अतिक्रमण आठवत आहेत.
त्यामुळे आता रस्ते कामाला कधी मिळणार का असा सवाल उपस्थित होत असतानाच जर हे काम पुन्हा संथ गतीने झाले तर अनेकांच्या उद्योग धंद्यावर परिणाम होणार यात शंका नाही.
हा रस्ता तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे आणि खुर्द रस्त्याची संपूर्णता वाताहत झाली आहे. मात्र याकडे सर्वजनिक बांधकाम खाते आणि स्मार्ट सिटी चे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. याचा फटका नागरिकांना बसला आहे.
सध्या एपीएमसी ते कंग्राळी खुर्द येथे सर्वत्र मागील दोन-तीन वर्षापासून काम आला सुरुवात झाली आहे. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता पूर्ण कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. सोमवारी या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे.
तर काहीजणांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण काढून घेतले आहे. मात्र जर अतिक्रमण काढून घेतले असले तरी प्रत्यक्षात रस्त्याला कधी सुरुवात होणार हा प्रश्न अंतर्मुख करणारा ठरत आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे. तर हा स्त्या अर्धवट टाकल्याने येथे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने पूर्ण करून नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
सोमवारी जेसीबी व इतर क्रेनच्या सहाय्याने येथील अतिक्रमण हटविण्यात येत होते. काही नागरिकांनी आपमच होऊन अतिक्रमण काढून घेतले. दरम्यान हा रस्ता तातडीने व्हावा अशीच मागणी हे सारे जण करू लागले आहेत.