अनुदान नसल्याने घरांची कामे अर्धवट मागील वर्षी आलेल्या महापुरामध्ये चौदाशे हून अधिक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे या घरांचे कामे तातडीने करण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान करण्याची गरज होती. मात्र राज्य सरकारने अनुदान दिले नसल्याने या घरांची कामे अर्धवट पडलेले आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
गरीब कुटुंबांना अनुदान मिळाले नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. बेळगाव तालुक्यात कोणत्याही वस्ती योजनेतून मागील दोन वर्षांपासून घरे मंजूर झाली नाहीत. अशातच जी घरे महापुरात पडले आहेत त्यांचेही अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे तर या वर्षी पडलेल्या घरांचा सर्वे करण्यासही प्रशासन अजून तयारी दर्शवत नाही.
अशा परिस्थितीत अनेक जण भाडोत्री घरांमध्ये आपले वास्तव्य करून आहेत. त्यांची समस्या मोठी झाली आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर घरांची कामे कशी होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान काहींच्या घरांची कामे अर्धवट झाले आहेत.
अनुदान नसल्याने ती तशीच पडून आहेत. या वर्षीच्या पावसात ही इतरत्र भाडोत्री घरांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. पुरात ज्या घरांची पडझड झाली आहे त्यांनाही अनुदान मिळाले नाही.
उलट जी वस्ती योजनेतून घरे मंजूर झाले आहेत त्यांची ही कामे अर्धवट असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा शासनाने तातडीने अनुदान मंजूर करून गरिबांना मदत करावी आणि जी घरी अर्धवट आहेत त्यांच्या उभारणीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.