कोरोनाने देशात आपला मोर्चा संपूर्णपणे वळविण्याआधी खबरदारी म्हणून सर्वप्रथम शाळा बंद करण्यात आल्या. परंतु लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण पद्धती तसेच विद्यागम योजनेंतर्गत अनेक शिक्षक गावोगावी जाऊन विध्यार्थ्यांना शिकवत आहेत.
कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाला उशीर झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून याला काही ठिकाणी चांगला प्रतिसादही मिळत आहे. मात्र शाळा सुरू झाल्याशिवाय शैक्षणिक वर्षाची घडी व्यवस्थित बसणार नाही. कोरोना महामारी मुळे यंदाचे वर्ष वाया गेले आहे विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोयीचे ठरावे या दृष्टिकोनातून शाळा सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात अभ्यासात कपात करून विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी शिक्षण खात्याने हालचाली गतिमान केल्या आहेत.
येत्या महिन्याभरात जर शाळा सुरू झाल्या तर अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना सोयीचे ठरावे या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. शैक्षणिक वर्षातील महत्त्वाचे दिवस वाया गेल्याने शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासाचे नियोजन व्यवस्थितरित्या व्हावे, यासाठी 40 ते 50 टक्के अभ्यासक्रम शिकविला जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 टक्क्यांची कपात यापूर्वीच केली असून कोरोनामुळे मे महिन्यात सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षाला अधिक विलंब झाला आहे.
तसेच 120 दिवसांचे शैक्षणिक वर्ष करण्यासह अभ्यासक्रमात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लवकर शाळा सुरू होणार नाहीत, असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात पुन्हा कपात करण्याचा विचार सुरू सुरू आहे.