सांबरा येथे आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गावातील सुमारे 400 हुन अधिक घरांमध्ये पाणी घुसल्याने गावकऱ्यांची एकाच तारांबळ उडाली.
सायंकाळी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सुमारे पाच तास झालेल्या पावसामुळे एकच हाहाकार माजला. पावसाचा जोर रात्री 10 पर्यंत कायम होता.
सर्वाधिक फटका महादेव नगर येथील नागरिकांना बसला. या भागातील अनेक घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. घरातील पाणी काढताना नागरिकांची दमछाक झाली. गावातील इतर भागातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले.
सांबरा गावाशेजारील नाल्यामुळे गावात पावसाचे पाणी शिरले होते ग्राम पंचायतीचा हलगर्जीपणा देखील याला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे
बुधवारी सायंकाळीची सांबरा गावातली पावसाची दृश्ये आहेत नाल्या शेजारी असलेल्या घरातून असं पावसाचे पाणी आर पार झालं…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 9, 2020