बेळगावच्या जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची मानवी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमित भाते, आणि डॉ. पारितोष देसाई यांनी भारत बायोटेकची कॅव्हॅक्सीन व झायडूसची अशा दोन्ही लसींची मानवी चाचणी केली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनमध्ये पहिल्या टप्प्यात ४ जणांना आणि दुसऱ्या टप्प्यात ५० जणांना लस देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात झायदूस कॅण्डीलाची चहसानी १७५ जणांवर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणी झायदुसने आपल्याच प्रयोगशाळेत केली आहे. एकूण जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये २२९ जणांना मानवी लस देण्यात आलेली आहे. यापैकी सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोणालाही लस दिल्यानंतर कोणताही त्रास जाणवलेला नाही किंवा रिऍक्शन झालेली नाही.
मानवी लस टोचण्याचे जे निकष ठरविण्यात आले आहेत, त्याअंतर्गत १८ ते ६५ वयोगटातील सुदृश व्यक्तींना लस दिली जाते. भारत बायोटेकने १८ ते ५५ हा वयोगट निश्चित केला. तर झायडूसने १८ ते ६५ हा वयोगट निश्चित केला आहे.
जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस एकूण ५४ जणांना तर झायडूसची लस एकूण ५५ जणांना देण्यात आली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन लस एकूण ५४ जणांना तर झायडूसची लस एकूण ५५ जणांना देण्यात आली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन पहिली लस दि. ३१ ऑगस्ट रोजी चार जणांना देण्यात आली. त्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. १४ दिवसानंतर त्यांना परत दुसरी लस देण्यात आली.
बेळगावमध्ये मानवी चाचणी करून घेण्यासाठी डॉक्टर, वकील, आरोग्य कर्मचारी, अर्थसल्लागार, डॉक्टरांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद आणि त्यांच्या पत्नी यांनीही चाचणी करून घेतली आहे. ही चाचणी करून घेणाऱ्यांमध्ये मुळगुंद हे एकमेव जोडपे आहे. जीवनरेखा हॉस्पिलने केलेल्या आवाहनानुसार बेळगावमधील अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
भारत बायोटेक आणि झायडूस कॅन्डीला या कंपनीच्या लस हॉस्पिटलमध्ये दिल्या गेल्या. यापैकी कोणालाही त्रास झाला नाही. लस दिलेल्यांच्या शरीरात प्रतिजैविके (अँटीबॉडीज) तयार झाल्या आहेत का? याची चाचणी सुरु असल्याचे डॉ. अमित भाते यांनी सांगितले.