बेळगाव तालुका भागातील हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची नवे दोन ठिकाणच्या मतदार यादीत असल्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या रहिवाशांनी मतदारणाची नावे एकाच यादीत समाविष्ट करून, मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीत जवळपास ३५०० मतदार हे महानगरपालिकेच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. यामुळे मतदारनमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
बेळगाव महानगर पालिकेच्या व्याप्तीतील प्रभाग क्रमांक ४० मधील बॉक्साईट रोडचे रहिवासी असलेल्या मतदारांची नावे हिंडलगा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४, ५, ८ , ९ , आणि १० मध्ये समाविष्ट आहेत .
बेळगाव महानगरपालिका आणि हिंडलगा ग्रामपंचायत या दोन्ही मतदार संघांच्या यादीत नाव समाविष्ट असणे ही बाब बेकायदेशीर आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले असून हिंडलगा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. यामुळे निवडणुकांपूर्वी तहसीलदारांनी तातडीने कारवाई करावी असे आवाहन या नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन मतदार याद्यांऐवजी एकाच मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करावे, आणि निवडणुकांपूर्वी ही दुरुस्ती करण्यात यावी यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती हिंडलगा ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विठ्ठल देसाई यांनी दिली.
निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार याद्या योग्यरितीने दुरुस्त करून त्वरित नव्या मतदार याद्या जाहीर कराव्या, यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य देण्याची तयारी हिंडलगा ग्राम पंचायतीचे सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी दर्शविली आहे.