निवडणूक जाहीर नाही कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मे महिन्यामध्ये या निवडणुका होण्याची शक्यता होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका येत्या दोन महिन्यात होणार असल्याचे भाकित करण्यात येत आहे.
या साऱ्या गोष्टी होत असल्या तरी इच्छुकांनी मात्र आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा आतापासून उडत असल्याचे दिसून येत आहे. आतापासूनच अनेकजण पार्ट्यांचे आयोजन करत आहेत तर मतदारांच्या भेटीगाठी घेऊन जनमत घेत आहेत. या निवडणुका अजून निवडणूक आयोगाने जाहीर केल्या नसल्या तरी अनेकांनी मात्र आपली तयारी जोरदार सुरू ठेवली आहे.
त्यामुळे यावेळी निवडणुकांचा धुरळा मोठ्या प्रमाणात उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी राष्ट्रीय पक्षाने जोरदार आमिषे दाखवली होती. यावेळी ही तशीच अवस्था होणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक जण स्वयंस्फूर्तीने आपला अर्ज भरणार आहेत. त्यामुळे मतदारांच्या बळावर जो निवडून येईल तोच ग्रामपंचायती वर राहणार आहे. निवडणूक आयोग येत्या महिन्याभरात ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा करणार आहे.
त्यासाठीची सर्व ती तयारी निवडणूक आयोग करत आहे. मात्र इच्छुकांनी आतापासूनच जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. अनेक जण भेटीगाठी घेऊन मतदारांना आमिषे दाखवण्यास सुरुवात केली असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुकांनी मात्र आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून्यास सुरुवात केली आहे.