Friday, January 24, 2025

/

जुगारी अड्ड्यावर छापा : जुगारी अटकेत

 belgaum

जुगारी अड्ड्यावर छापा : जुगारी अटकेत

बेळगावच्या टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या राजहंस गल्ली येथील सदानंद मठाच्याजवळ असलेल्या बोळात मध्यरात्री काहीजण जुगार खेळात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बेळगावचे पोलीस आयुक्त विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडीचे पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांच्या सहकार्यांनी रात्री १.१५ च्या सुमारास ही धाड टाकली .

या धाडीत मंजूर जोपधार, प्रदीप लाटूकार, मोईज गचवाले, विजय पाटील, परशुराम मेत्री, सुशील मुदोळकर, बाबू यादव, अनिल यळ्ळूरकर, किसन पाटील, जहांगीरखान पठाण, विजय शिंदोळकर, दीपक होण्यालकर, आकाश जक्काने, विनायक ग्नाचारी, सागर मुतगेकर, समीर तहसीलदार, सदानंद असलकर, हिदायशेक शेख, परशुराम लोहार, अभि भोगार, वासिम पत्ते, संदीप मुदोळकर अशा २२ जणांना अटक केले असून त्यांच्याकडून १,८५,९१० रुपये इतकी रक्कम जप्त केली आहे. यासह १४ मोबाईल संच जप्त केले आहेत. या सर्वांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे आणि सहकाऱ्यांचे पोलीस आयुक्तांनी कोतुक केले आहे.

यापुढील काळातही जुगार किंवा कोणत्याही अवैधरित्या, बेकायदेशीर होणाऱ्या गोष्टींना आळा घालून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी पोलीस विभाग सक्रिय असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.