Wednesday, December 25, 2024

/

गांजा प्रकरणी चौघांना अटक

 belgaum

बेळगाव शहर आणि परिसरात गांजा विक्री जोरदार सुरू असताना आता हा गांजा गोव्यावरून आणत असल्याचे उघडकीस आले आहे. गोव्यावरून बेळगावकडे गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या चौका जणांना जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.

ही कारवाई जांबोटी येथे करण्यात आली आहे. याप्रकरणी अयाज शरीफ सौदागर वय 33 राहणार रुक्मिणीनगर, इब्राहिम मुल्ला वय 26 राहणार आझादनगर, नियाजअहमद शफीअहमद नायकवाडी वय 37 राहणार अशोक नगर, इमरान हाशिम मुल्ला 36 राहणार शिवाजीनगर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे सर्वजण बेळगाव परिसरातील आहेत.

त्यांच्याकडून दोन किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गांजाची किंमत 42 हजार रुपये इतकी आहे. याचबरोबर त्यांच्याकडील ऑटोरिक्षा हिरो होंडा मोटरसायकल आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी आणि अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

बेळगाव शहर आणि परिसरात गांजा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील बर्‍याच ठिकाणी छापे टाकून पाच ते सहा लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. तर अजूनही ही कारवाई करण्यात येत आहे.

त्यामुळे जिल्हा पोलीस अनेक गांजा विक्री करणार यांच्या मुसक्या आवळून जर बंद करत आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाया सुरूच ठेवणार असे यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.