रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. हा पाऊस अवकाळी पावसा सारखा झोडपून काढला असला तरी अजूनही ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील पंचवीस ते महिन्याभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे नदीकाठ परिसरातील पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आताही काही भागात रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे एकीकडे आसमानी संकटात असताना दुसरीकडे रोगाच्या भीतीमध्ये शेतकरी अडकला आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी भात पिकावरील करपा रोगाची लागण झाली आहे.
पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. उर्वरित पिकेही वाया जाण्याचा धोका निर्माण झाला असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा भीती व्यक्त करण्यात येत आहे. आणखी काही दिवस पाऊस जावा अशीच मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पावसाची गरज नाही. मात्र अधून मधून कोसळणाऱ्या मोठ्या सरी पुन्हा धोका निर्माण कर करणार अशी भीती व्यक्त होत आहे.
कणबर्गी परिसरात सुमारे पाचशे ते सहाशे एकर शिवारात भात पिकावर करपा रोग पडला आहे. यामुळे आता हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातच मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. हा पाऊस जावा अशी मागणी शेतकर्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.