अनगोळ येथील सुपीक जमीन बुडा बळकावू पहात आहे. अनगोळ गावातील शेतकरी बांधवांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे संतापाची लाट उसळली. 10 तारखेला जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
त्या विरोधात अनगोळ येथील नागरिकांनी बैठक घेऊन बुडाला एक इंचही जमीन देणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे. बुडा च्या वतीने स्कीम क्रमांक 62 लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदर नोटीस मध्ये 50 / 50 फार्मूला जाहीर करण्यात आला आहे. मात्र याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. 23 तारखेच्या आत या नोटिशीला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनगोळ तसेच बेळगाव परिसरात जमीन बळकावण्याचा हा घाट घालण्यात आला आहे. जमिनीवर बुडाच्या वतीने विविध योजना राबविण्यासाठी भूसंपादन करण्याचा घाट घालण्यात आला आहे. मात्र त्याविरोधात आता शेतकरी सरसावले असून बैठकीत एक इंचही जमीन देणार नाही असा निर्धार केला आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही शेतकऱ्यांनी दर्शवली आहे.
बुडाने बजावलेल्या नोटीस ला उत्तर देण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. 2012 झाली ही असाच प्रकार घडला होता. अनगोळ, वडगाव, शहापूर जुने बेळगाव येल्लूर या परिसरात असणारी जमीन ही तिबार पिकी आहे. पावसाळ्यात भात हिवाळ्यात कडधान्य तसेच उन्हाळ्यात भाजीपाला लागवड केली जाते. येथे भात जोंधळा मसूर वाटाणा मोहरी हरभरा अशी पिके घेण्यात येतात. त्यामुळे तीबार पिकी जमीन काबीज करण्यासाठी बुडाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला कधीही आपण सहकार्य करणार नसल्याचे बैठकीत म्हटले आहे. अनगोळ परिसरात अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेती व दुग्ध व्यवसायावर अनेकांचे उदरनिर्वाह चालवतात. मात्र बुडाने पुन्हा नोटिसा बजावून परिसरातील शेतकऱ्यांना शेती बलकवण्याचा घाट घातला आहे. त्याला असहकार्य दर्शविण्यात येत आहे.
त्यामुळे एक इंचही जमीन देणार नाही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला गजानन जाधव अशोक होळकर अर्जुन बुद्रुक कृष्णा बुद्रुक सोमांना सोमनाचे मारुती बुद्रुक नागेश जाधव मनोहर बुद्रुक प्रदीप गडकरी नारायण दगडूचे मनोहर सोमनाचे पिराजी सोमनाचे सुधीर भेंडी गिरी अशोक मुतगेकर यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.