Saturday, December 28, 2024

/

कान फुटणे-वाचा डॉ सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

कान फुटणे आणि गळणे हा अगदी सामान्य तसेच प्रत्येकाला होणारा विकार आहे. एकदा एक रुग्ण अगदी धावत पळतच आला. म्हणून लागला, ‘डॉक्टर पहा बरं! मला बहुतेक ब्रेनट्यूमर झाला आहे. अहो, कानामागे ही एवढी मोठी गाठ झाली आहे. चक्कय येतेच, ताप येतोय, काही सुचतच नाही बघा’ तपासून पाहिलं असता कानामागे मॅस्टॉईड म्हणून हाडाचा पोकळ भाग असतो.

त्याला सूज आलेली, तो भाग लालबुंद होऊन कानातून चिकट पाणी येत होते. ब्रेनट्यूमर नसून कानाच्या इन्फेक्शनमुळे कान फुटून गळत होता व त्यातील काही द्राव मध्य कानातून मॅस्टॉईड हाडाच्या पोकळीत साठल्यामुळे सूज येऊन ठणका येत होता. साहजिकच एवढं सगळं असल्यामुळे चक्कर येत होती.
कान फुटणे, कान गळणे हा अनेक रुग्णांना होणारा अगदी सामान्य विकार आहे. वरचेवर होणार्‍या सर्दीमुळे घशातून कानाला जोडणार्‍या नलिकेद्वारे हे इन्फेक्शन कानाकडे पोहोचते. मध्य कानात चिकट पाणी व पू साठून कानाच्या पडद्यावर दाब येतो व पडद्याला भोक पडून कान गळून लागतो. या विकाराला ‘ओटायटीस मिडीया’ व ‘ओटायटीस एक्सटर्ना’ अशी नावे आहेत.

रुढ उपचारांमध्ये अँटीबायोटीक्स व क्वचित स्टिरॉईड्स देऊन हा विकार थांबवला जातो. परंतु हा त्रास वारंवार होऊ शकतो. त्यामुळे आधीच्या रुग्णयाच्या बाबतीत सांगितल्याप्रमाणे हे इन्फेक्शन मध्यकानातून मॅस्टाईड हाडापर्यंत जाऊ शकते. हे हाड जाळीदार असल्याने इन्फेक्शन जोमाने फोफावते. भरपूर ताप येतो. क्वचित औषधांनी कमी न झाल्यास मॅस्टाईड सुई घालून पंक्चर करुन स्वच्छ करावे लागते. हे इन्फेक्शन असेच डोक्याच्या खालच्या बाजूस असलेल्या छोट्या मेंदूकडे पसरते व मेंदूच्या आवरणाचा दाह (मेनिंजायटीस हा विकार) होऊ शकतो. हा दाह वाढतच गेल्यास कानातून जाणारी चेहर्‍याच्या हालचाली कंट्रोल करणारी शीर व कानातून श्रवणसंदेेश नेणारी शीर या दोहोंना इजा होऊन त्यांचे कार्य बंद पडू शकते.
उपचार : या विकारावर खात्रीशीर व संपूर्ण दुष्परिणाम विरहित उपचार होमिओपॅथिक व बाराक्षार औषधांनी करता येतात.
बाराक्षार- कॅलकेरिया सल्फ, सिलीशीया, कॅलकेरिया फ्लूर अशी औषधं कितीही जुनाट आजार बरा करतात.
www.drsonalisarnobat.com
होमिओपॅथी- कान गळण्याची जुनाट व्याधी असल्यास अर्सेनिकम् अल्ब हे औषध गुणकारी आहे. कायमच कानात पू होऊन ठणका मारत असल्यास अर्सेनिक आयोडेटम् बरायटा मूर, कॅल्केरिया फ्लूर, कॅल्केरिया ऑयोड, कालीसल्फ अशी औषधं आहेत.

मॅस्टॉईड हाडापर्यंत इन्फेक्शन गेल्यास कॅप्सीकम, अमोनियम पायक्रीकम्, काली मूर, ओनॉस्मोडियम ही औषधे वापरता येतात. कानाच्या पडद्याला भोकं पडलेलं असल्यास कॅलकेरिया कार्ब, सिलीशीया, ट्युबरक्यूलीनम् अशी औषधं उपयुक्त ठरतात. मूलेन ऑईल नावाचे होमिओपॅथिक औषधांनी सिध्द केलेले तेल कानात घालण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे कानातील ठणका कमी होण्यास मदत होते. जुनाट विकार असल्यास इतर व्यक्तीनिष्ठ लक्षणे व वैशिष्ट्ये लक्षात घेऊन उपचार केल्यास संपूर्ण गुण येण्याची खात्री असते.
9916106896
9964946918

कान फुटणे गळणे हा विकार कसा होतो यावर होमिओपथि मध्ये उपचार काय आहेत.काय सांगतात डॉ सोनाली सरनोबत पहा हेल्थ टिप्स मध्ये फक्त बेळगाव Live वर #drsonalisarnobat#homeopathicmedicine#livebelgaum

Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 19, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.