राज्यातील डॉक्टरांनी आंदोलन छेडून सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून सोडली आहे. त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्ण यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. महत्वाची म्हणजे राज्य आणि जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनही आली नसल्याने मोठी समस्या झाली आहे.
याकडे गांभीर्याने लक्ष देऊन डॉक्टरांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान हेल्थ बुलेटीनमध्ये दररोज किती पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आणि किती रुग्ण निगेटिव याचबरोबर जिल्ह्यात आणि राज्यात किती प्रमाणात रुग्ण संख्या वाढली याकडे साऱ्यांच्या नजरा असतात. मात्र मंगळवारी हेल्थ बुलेटीन आली नसल्याने मोठी समस्या झाली आहे.
कोरोना सारख्या महामारीत अनेक जण आपल्या जीवाशी लढा देत असताना डॉक्टरांनी आंदोलन छेडून अनेक रुग्णांवर मृत्यू ओढविल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र आपल्या मागण्या जर मान्य होत नाही तोवर मी काम बंद आंदोलन छेडू असा इशारा सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. कोरोना महामारी अनेकजण भयभीत होऊन आपले प्राण सोडत असल्याच्या घटना उघडकीस येत असतानाच डॉक्टर हे देव असतात आणि तेच अशा काळात धीर देऊ शकतात याकडे डॉक्टरांनीही लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान ड वर्ग डॉक्टर संघटनेने आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे आणि इतर सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी करत आंदोलन छेडले आहे. त्यामुळे सध्यातरी डॉक्टर जोमात आणि आरोग्य यंत्रणा कोमात अशीच अवस्था झाली आहे. डॉक्टरांच्या समस्या तातडीने सोडून राज्य सरकारने सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.