बेळगाव येथील सुवर्ण सौध समोर कित्तूर राणी चन्नममा सोबत संगोळळी रायन्न यांचा पुतळा बसवा अशी मागणी आपण ऐकली होती आता या मागणी नंतर सुवर्ण विधान सौध समोर बेळवडी मल्लम्मांचा पुतळा बसविण्याची मागणी केली जात आहे.
येथील सुवर्ण विधानसौध समोर बेळवडी मल्लमा यांचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी बेळवडी मल्लमा अभिमानी संघटनेने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळवडी मल्लम्मांचा इतिहास मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इतिहास लाभलेल्या या शूर विरांगणेचावसा जपण्यासाठी त्यांचा पुतळा बसविण्यात यावा.
तसेच नव्या पिढीला हा इतिहास जपण्यासाठी फेब्रुवारी २८ ते १ मार्च या दोन दिवसात शासकीय उत्सव जाहीर करावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.