केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विभागात काम करणाऱ्या दोन अधीक्षक आणि एका निरीक्षकास पाच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक गेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या जीएसटी अधिकाऱ्यांनी काही कारखान्यांना भेट देऊन जीएसटी रक्कम न भरल्याबाबत २० लाखांची लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आला आहे. याविरोधात बेळगावच्या जीएसटी अधिकाऱ्यांच्या यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून लाच घेतल्याप्रकरणी या तीन अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे.
या कारवाईसाठी सीबीआयने सापळा रचला होता. यादरम्यान सुरुवातीच्या काळात २० लाखांपैकी ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर दोन अधीक्षकही या जाळ्यात अडकले. याप्रकरणात बेळगावसह गाझियाबादचेही कनेक्शन असल्याची माहिती उपलब्ध झाली असून पुढील तपास प्रगतीपथावर आहे.
अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे अजून जाहीर करण्यात आली नसून अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना धारवाड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.