Saturday, November 16, 2024

/

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.

 belgaum

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के . के . कोप्प ( ता . बेळगाव ) येथील एका वृध्दाने अंगावर पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आपल्या मुलीच्या निधनाच्या दु : खामुळे या वृध्दाने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. गुरुनाथ राचप्पा नेसरगी ( वय 72 ) असे त्याचे नाव असून गुरुनाथ हे माजी सैनिक होते.

मुलीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता रिक्षासाठी आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेवून पेटवून घेतले होते. गंभीर जखमी अवस्थेतील गुरुनाथ यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

उपचाराचा उपयोग न होता बुधवारी या वृध्दाचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत. या घटनेने के ले कोप्प परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.