शहरात लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण उपलब्ध होणार आहे. विद्या प्रसारक मंडळाला केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती गजाननराव भटकंडे शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी दिली आहे.
राज्याच्या सार्वजनिक शिक्षण खात्याकडून नुकतेच केम्ब्रिज इंटरनॅशनल सुरु करण्याबाबतची परवानगी दिल्याने लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाईल.
कुंतीनगर (टीचर्स कॉलनी) येथील दोन एकर प्रशस्त जागेत उभारलेल्या इमारतीत केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुल सुरु होणार आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशाल मैदान आणि इतर सुविधांमुळे केम्ब्रिज स्कुल शहरातील एक उत्कृष्ट शाळा म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास भातकांडे यांनी व्यक्त केला आहे.
लंडन येथील प्रसिद्ध केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कुलच्या देशभरात १७० शाळा असून अत्याधुनिक वर्गशाळा, प्रयोगशाळा, स्मार्ट वाचनालय, स्मार्ट क्लासरूम, स्पेशल डायनिंग रूम, संगणक क्लास रूम आदी सुविधा शाळेत असणार आहेत.
केम्ब्रिजच्या पूर्वप्राथमिक विभागाला मॉन्टेसरी प्री स्कुलची फ्रँचायझी मिळाली असून प्रवेश प्रक्रियेबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार आहे. गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळा आणि केम्ब्रिज इंटरनॅशनल शाळा अशा दोन स्वतंत्र शाळा असतील, अशी माहिती अध्यक्ष भातकांडे यांनी दिली.