बेळगाव शहर परिसरात एकीकडे चोऱ्या घरफोड्या वाढत असताना आता सायकल चोरटेही सक्रिय झाले आहेत. घरासमोर किंवा कंपाउंडमध्ये लावण्यात आलेल्या सायकल चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मोटार सायकलिंग बरोबरच सायकल चोरण्याचे प्रकार घडत आहेत.
मंडोळी रोड नित्यानंद कॉलनी येथे कंपाउंडमध्ये उभी करण्यात आलेले सायकल करण्यात आली आहे. ही चोरीची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. कोमल परेश पाटील यांनी आपल्या कंपाऊंडमध्ये ठेवलेली सुमारे बारा हजार रुपयांच्या किमतीचे सायकल चोरण्यात आली आहे. गुरुवारी चोरीचा हा प्रकार घडला आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा या या घटनेचा सारा प्रकार कैद झाला असून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. आता चोरटे सक्रीय झाले असून पोलिस मात्र सुस्त झाल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. याकडे गांभीर्याने विचार करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मंडोळी रोड नित्यानंद कॉलनी येथे दुचाकीवरून तिघे जण आले एकटा खाली उतरून कोमल पाटील यांनी आपल्या कंपाऊंडमध्ये लावलेले सायकल पळविली तर आणखी दोघेजण दुचाकीवरून तेथून पसार झाले.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान चोरीच्या वाढत्या घटना आता भीतीदायक ठरू लागले आहेत. वारंवार घरफोड्या दुचाकी आणि सायकल चोरी होत असल्याने एकच खळबळ माजली आहेत.