सिव्हिल हॉस्पिटल मध्ये कार्यरत असणाऱ्या “डी” ग्रुप कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. या कारणास्तव या कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वी आंदोलन केले, पालकमंत्र्यांची भेटही घेतली.
विविध मागण्यांसाठी निवेदनही सादर करण्यात आले. परंतु अजूनपर्यंत आश्वासनांची पूर्तता करण्यात आलेली नाही.
मार्च महिन्यापासून कुरणांचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. आणि त्याचदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूतही वाढ होऊ लागली. या दरम्यान आपला जीव धोक्यात घालून कोविड वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना खरे कोविड वॉरियर्स म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.
आणि त्यांना गौरवधन म्हणून १०००० रुपये मानधन देण्याचे जाहीर केले. परंतु हे गौरवधन अजूनपर्यंत या कर्मचाऱ्यांना मिळाले नाही. त्याचप्रमाणे यांच्या कार्याची दखल घेऊन सन २०१४-२०१५ या काळात पगारवाढ करण्यात आला होता. पण आजपर्यंत हा वाढीव पगार देण्यात आला नाही.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये “डी” ग्रुप मध्ये कार्यरत असणारे असे १२० कर्मचारी आहेत. कोविड रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह ने-आण करण्यासाठी हे कर्मचारी पुढे सरसावतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्य करण्याऱ्या या कर्मचाऱ्यांना परमनंट तत्त्वावर नोकरीवर मिळावी, जाहीर करण्यात आलेले मानधन लवकरात लवकर मिळावे, तसेच वाढीव पगाराची रक्कमही त्वरित देण्यात यावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.