स्मार्ट सिटीच्या यादीत बेळगावचे नाव आल्यापासून बेळगावमधील “स्मार्ट” वर्क हळूहळू प्रकाशझोतात येत आहे. शहरातील मुख्यरस्त्ये वगळता आतील भागातील रस्त्यांवर अनेकवेळा डागडुजी, रुंदीकरणाच्या नावाखाली भले मोठे रस्ते, डांबरीकरण करण्यात आले आहे.
परंतु “नेमेचि येतो मग पावसाळा” या उक्तीप्रमाणे शहरातील अनेक रस्ते आता उखडायला सुरुवात झाली आहे. फोर्ट रोडवरील मशिदीसमोरील रस्त्याच्या मधोमध एक खळगा पडला आहे.
या खळग्यामुळे कोणतीही हानी अजून तरी झालेली नाही. परंतु प्रशासनाची विकासकामे पाहता याठिकाणी पोहोचायला किती वेळ लागेल याचा अंदाज न बांधलेलाच बरा!
परंतु नागरिकांचे भाग्य जर चांगले असेल तर प्रशासनाच्या नजरेत ही गोष्ट लवकर यावी, आणि कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी याची डागडुजी करण्यात यावी, इतकी माफक अपेक्षा!