बेळगाव. शहापूर सराफ असोशियन यांची आज दिनांक 3 सप्टेंबर 2020 रोजी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष दिलीप तळवे यांच्या अध्यक्षते खाली कोरोना संदर्भात बैठक पार पडली.
सरकारी गाईडलाईन प्रमाणे सभासदानी स्वसुरक्षा राखून,सोशल डिस्टन्स मास्क सॅन्टाटायझर चा वापर करत आपापले व्यवसाय स्वजबाबदारीवर सुरू ठेवावेत असे आवाहन करण्यात आले.
शहापूर सराफ असोसिएशन तर्फे त्याबाबत कोणतेही वेगळे निवेदन नसून ग्राहक व दुकानदार यांनी आपले कोरोना पासून बचाव करत सुरक्षितपणे आपले व्यवहार करावेत असे सांगण्यात आले आहे.
बैठकीसाठी अनेक सभासदासह उपाध्यक्ष अभिनंदन लेंगडे, सेक्रेटरी उदय कारेकर, मकरंद कारेकर, अतुल अवलक्की हे हजर होते.