बेळगाव येथील एका पर्यटकाचा किटवाड(तालुका चंदगड) येथील धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.
मयत हा मूळचा चेन्नईचा रहिवाशी असून तो बेळगाव रेल्वे स्थानकावर कामाला होता दक्षिण पश्चिम रेल्वे मध्ये तो काम करत होता.बेळगाव रेल्वे स्थानका वरील आपल्या मित्रासोबत तो किटवाड धबधब्यावर फिरायला आला होता.रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने सांडव्या मुळे तयार झालेल्या धबधब्यात पडून मृत्यू झाला आहे.
किटवाड येथील सरपंच ओमाना सुतार यांनी कोवाड पोलिसांत या घटनेची माहिती दिली आहे.सदर मयत व्यक्ती धबधब्यात पडल्याने मृतदेह प्रवाहात वाहून गेला आहे उद्या सकाळी मृतदेह बाहेर काढला जाणार आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर किटवाड धबधबा आणि धरण पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय किटवाड ग्राम पंचायतीने घेतला असून ही बंदी असताना देखील फिरायला गेलेल्या पर्यटकांना फिरणे अंगलट आले आहे अन एकाला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या पंधरा वर्षात घडलेली ही पहिलीच घटना आहे.