कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गौंडवाड या गावात देवस्थानाची इनामदाखल देण्यात आली जागा परस्पर विक्री करण्यात येत आहे, या विरोधात आज येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गौंडवाड येथील सर्व्हे क्रमांक ७८ आणि ८८ येथील जागेत ३ देवस्थान आहेत. या जागेमध्ये प्लॉट्स पाडून या जागांची परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे सदर जागा देवस्थानाच्या नावे नोंदणी करून देण्यात यावी, यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या जागेमध्ये प्लॉट्स पाडण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना जाण्या-येण्याचा रस्ता बंद झाला आहे. रहदारीचा मार्ग बंद झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. देवस्थानाचे बांधकाम करण्यासाठी इनाम देण्यात आलेल्या जागेवर ग्रामस्थांचा हक्क असायला हवा.
परंतु प्लॉट्स पाडून त्याची विक्री केल्याने ही जागा दुसऱ्यांच्या ताब्यात जाणार आहे . हे टाळण्यासाठी या जागेची नोंद मंदिरांच्या नावे करावी अशी मागणी गौंडवाड ग्रामस्थानी केली आहे.
हे निवेदन सादर करताना ग्रामस्थ उपस्थित होते.