बेळगावच्या शिरपेचातील मानाच्या तुऱ्यांपैकी एक म्हणजेच “सांबरा विमानतळ”! जेव्हापासून विमानतळावरून सेवा सुरु झाली आहे तेव्हापासून अधिकाधिक विमानांचे उड्डाण होत असून प्रवासी संख्याही वाढली आहे.
लॉकडाऊनचा काळ वगळता इतर वेळेत विमानसेवा उत्तमरित्या सुरु आहे. शिवाय विमानतळाचे नूतनीकरणही करण्यात येणार आहे.
एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत झालेल्या उड्डाणाचा आणि प्रवाशांचा घेतलेला हा आढावा :-
एप्रिल : एकही उड्डाण नाही. मी : २८ विमान उड्डाणे, जून : ३९१ विमान उड्डाणे, जुलै ४५० विमान उड्डाणे, ऑगस्ट ४३२ विमान उड्डाणे झेपावली आहेत. तर मे महिन्यात ४३९ प्रवासी, जून महिन्यात ९८११ प्रवासी, जुलै महिन्यात १४१६२ प्रवासी आणि ऑगस्ट महिन्यात १७,९१७ प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे.