धोकादायक मांजा गळ्याला लागल्याने शनिवारी आणखी एक युवक जखमी झाला आहे या घटनेतून तो सुदैवाने बचावला आहे.राहुल राजगोळकर असे या युवकाचे नाव असून गांधी नगर ब्रिज जवळ ही घटना घडली आहे.
पतंग उडवताना कट झालेला मांजामुळे अनेक घटना घडत आहेत काल कपिलेश्वर उड्डाण पुलावर संभाजी नगर वडगांव येथील वसंत खनुकर नामक दुचाकी स्वार युवक जखमी झाला होता आज गांधी नगर ब्रिज वर महाद्वार रोड येथील राहुल राजगोळकर हा जखमी झाला आहे असून त्याचा गळा मांजाच्या धारेमुळे चिरला गेला आहे.
मागील वर्षी मांजा लागल्याने बेळगावात अनेक जण जखमी झाले होते जीव देखील गमवावा लागला होता.यावर्षी देखील मांजा लागून जखमी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
कपिलेश्वर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज ओल्ड पी बी रोडवरचे ब्रिज असो किंवा गोगटे सर्कल व हायवेचे ब्रिज असोत मांजा गळ्यात अडकून अनेक दुचाकीस्वार जखमी होत आहेत यासाठी ब्रिज वर काही दोन्ही बाजूनी काही तरी बांधा अशी मागणी वाढू लागली आहे.
इतकेच काय तर शहरात अनेक स्टेशनरी दुकानात विक्री करण्यात येणारा धारधार मांजा वर बंदी घाला अशी देखील मागणी वाढत आहे.