रामतीर्थ नगर येथील इंडियन वन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ माजली आहे. पोलीस स्थानकात याबाबत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. चोरट्यांना एटीएम फोडण्यात यश आले नसले तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडियन वनचे व्यवस्थापक महेश मोहनराव मठ यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. रामतीर्थनगर येथे हे एटीएम आहे. रोज सकाळी 6:30 वाजता एटीएम उघडले जाते आणि रात्री दहा वाजता बंद करण्यात येते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री दहा वाजता बंद करून कुलूप लावण्यात आला होता. मात्र चोरट्यांनी मध्यरात्री या एटीएम फोडून आत प्रवेश केला आहे. मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तो यशस्वी न झाल्याने त्यांचा डाव फसला आहे. शहर परिसरात आणि उपनगरात यापूर्वी असे प्रकार घडले आहेत. एटीएम फोडण्याचा प्रकार पुन्हा उघडकीस येत असून पोलिस प्रशासनासमोर आव्हान ठरले आहे. या आधीही चोरट्यांनी घरफोड्या केल्या होत्या. आता एटीएमला लक्ष बनविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक बि आर गडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे. एटीएम फोडण्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेज वरून गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. रामतीर्थ नगर येथे हा प्रकार घडला असून यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मध्यरात्री रामतीर्थ नगर येथे एटीएम फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा चोरटे सक्रीय झाल्याचे दिसून येत आहेत. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
Trending Now
Less than 1 min.
Previous article
Next article