बेळगाव येथील एपीएमसीच्या विकासासाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बंगळूर येथे सहकार मंत्री एस. ती. सोमशेखर यांची भेट घेऊन विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.
एपीएमसीसाठी आरडीपी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानापैकी प्रलंबित असलेले १५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे, याव्यतिरिक्त एपीएमसी विकासासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात यावे, यासाठी शिष्टमंडळाने सहकार मंत्र्यांना आवाहन केले.
त्याचप्रमाणे एपीएमसी आवारात भाजीविक्रीसाठी १ कोटी रुपयांपर्यंतच्या दुकानांची खरेदी केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर त्यांना या दुकानांचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे ५ वर्षांच्या अवधीसह त्यांना हप्तेबंधांनी करून देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, सुधीर गड्डे, युवा काँग्रेस नेते तौसिफ़ फनीबंद, बेळगाव ता. पं. सदस्य निलेश चंदगडकर आदी उपस्थित होते.