शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धर्मवीर संभाजी चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती परिसराचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु हे काम काही कारणास्तव रखडले होते. आज आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी येथे एका विजेच्या खांबाचा अडथळा होत असल्याचे निदर्शनास आले. हा विजेचा खांब वाकलेला असून कोसळण्याच्या परिस्थितीत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कामकाज थांबविण्यात आले होते. ही परिस्थिती लक्षात घेता, खांबावरून ज्या रहिवाशांना वीज पुरवठा करण्यात आला आहे ते रहिवासी, संबंधित कंत्राटदार आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.
आणि येत्या 4 दिवसात हा खांब हटवून सुशोभीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात यावे, अन्यथा स्वतः जेसीबीच्या साहाय्याने हा खांब हटविण्याची तयारी आमदार अनिल बेनके यांनी दाखविली.
या सुशोभीकरणासाठी आधी 16 लाख आणि आता पुन्हा बुडाकडून 15 लाख असा एकूण 27 लाखांचा निधी मंजूर करून घेण्यात आला असून, कोणत्याही सरकारी कामात दिरंगाई करणं मला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया आमदारांनी यावेळी व्यक्त केली.
सीमाभागात सुरू असलेल्या पुतळा राजकारणावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की छत्रपती शिवरायांचा आदर्श हा मी नेहमी बाळगतो. माझ्यासाठी शिवराय हे वंदनीय असून त्यांचा इतिहास लहान मुलांनाही अवगत व्हावा यासाठी घरोघरी शिवचरित्र पोहोचविण्याचे काम मी केले आहे. शिवाय प्रत्येक वर्षी जवळपास 4000 शालेय विद्यार्थ्यांची शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येते.
शिवाजी महाराज हे थोर राष्ट्रपुरुष आहेत. त्यांचा अवमान सीमाभागातच नाही तर संपूर्ण जगात कोठेही झाला तर तो कदापि सहन केला जाणार नाही. क्रांतिवीर संगोळी रायण्णा हेही थोर राष्ट्रपुरुष आहेत. त्यामुळे अशा राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना आता थांबल्या पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना व्यक्त केली.
एकूण 27 लाख खर्चून होणार धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसराचा कायापालट-आमदार बेनके यांनी पहाणी करून काम जलदगतीने…
Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 8, 2020