Monday, November 18, 2024

/

बेनके यांच्याकडून हेल्प फॉर नीड संस्थेला रुग्णवाहिका

 belgaum

एक सामान्य कार्यकर्ता आणि तळागाळातील लोकांची मदत करून त्यांना सहकार्य करणारे सुरेंद्र अनगोळकर यांचे कार्य कौतुकास्पद आहेत. त्यांची सामाजिक सेवा आणि सामाजिक बांधिलकी ही समाजाला हितकारी असून त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले आहे.

कोरोला सारख्या महामारीमध्ये सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली आहे. सिविल हॉस्पिटल असो किंवा कोणत्याही इस्पितळात त्यांनी ऑक्सिजन पुरविणारे गॅस दिले आहेत. त्यासाठी त्यांनी कोविल सेंटरमध्ये देखील जाऊन काम केले आहे. त्यांचे कार्य हे अनेकांना लाजवणारे आहे. त्यांच्या कामाची प्रशंसा करावी तितकी कमी आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला.

यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या संस्थेला म्हणजेच हेल्प फॉर निड या संस्थेला रुग्णवाहिका भेटीदाखल देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा नागरिकांनी उपयोग करून घ्यावा आणि कोणत्याही क्षणी सुरेंद्र अंगोळकर यांना हाक द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. आमदार अनिल बेनके यांनी रुग्ण वाहिका देऊन मोठे कार्य केले आहे

Ambulance help for needy
Ambulance help for needy from nourth mla benake

. सध्या कोरोना महा लमारीत त्यांचे काम अत्यंत लाभदायी ठरणार आहे. यावेळी सुरेंद्र होळकर यांनी आमदार अनिल बेनके यांचे आभार मानले.

सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या सामाजिक कार्याची दखल उत्तर आमदार अनिल बेनके यांनी घेतली असून हेल्प फॉर निडी या अनगोळकर यांच्या संस्थेला अंबुलन्स भेट दिली आहे.कोविड काळात शहर परिसरातील रुग्णांना मदत कार्यात या रुग्ण वाहिकेची मदत मिळणार आहे. यावेळी आमदार बेनके आणि अनगोळकर दोघांनीही आपले मनोगत व्यक्त केले
#mlabenakedonateambulance
#benakehelpshelpforneedy
#surendraangolkar
#belgaumlive

सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या सामाजिक कार्याची दखल उत्तर आमदार अनिल बेनके यांनी घेतली असून हेल्प फॉर निडी…

Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1, 2020

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.