बेळगाव शहर आणि परिसरात लॉकडाऊन काळात काही प्रमाणात चोरीचे प्रमाण घटले होते. मात्र आता पुन्हा चोरीच्या घटना वाढू लागले आहेत. बेळगाव येथे या प्रकारात महिलाही गुंतल्याचे उघडकीस आले आहे. नुकतीच पांगुळ गल्ली येथे एका महिलेच्या पर्समधील 50 हजार रुपये लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
या महिला गॅंगवाडी परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आता महिलाही चोरी प्रकरणात सक्रिय झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोवा येथील एक महिला खरेदीसाठी बेळगावात आली होती.
तिच्या पाकीट मधील सुमारे 50 हजार रुपये दोन महिलांनी लांबविले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे. यापूर्वी पुरुष या प्रकरणात गुंतलेले असताना आता महिलाही यामध्ये आढळत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण असले तरी महिलांनी सतर्कता बाळगणे ही काळाची गरज बनली आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात वारंवार चोरीचे प्रकार घडत आहेत. विशेष करून बाजारपेठेत आलेल्या महिलांचे पर्स लांबविण्यात महिला तरबेज आहेत. त्यामुळे याबाबत गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त होत आहे. गोवा येथील आलेल्या महिलेच्या पर्समधील केवळ दोन मिनिटात 50 हजार लांबविण्यात आले आहेत.
ही घटना नुकतीच उघडकीस आली असली तरी महिलांनी चोरी केल्यामुळे खळबळ माजली आहे. यासंबंधीचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आता बाजारहाटसाठी येणाऱ्या महिलांनी दक्षता बाळगावी असे जाणकार आता सांगण्यात येत आहे. आता चोरी प्रकरणात महिलाही गुंतत असल्याने खळबळ माजली आहे.