बेळगाव तालुका तसेच जिल्ह्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. वेगवेगळ्या संस्थाच्या निवडणुका जाहीर होत आहेत. नुकतीच बेळगाव मध्यवर्ती जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
आता तालुका कृषी पत्तीनं सोसायट्यांच्या ही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी आतापासूनच हालचाली गतिमान करण्यात येत आहेत. अनेक जण या निवडणुकीसाठी प्रयत्नात असून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत.
कृषी पत्तीन सोसायट्यांची निवडणुक महत्त्वाची मानली जाते. आताही निवडणूक जाहीर होताच रणधुमाळी माजणार आहे. एकेकाळी मराठी भाषिकांच्या ताब्यात असणारी ही सोसायटी निवडणूक आता राष्ट्रीय पक्षांकडे वळू लागले आहे. त्यामुळे मराठी नेते शांत आणि राष्ट्रीय पक्षांचे नेते जोमात अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी आतापासूनच मराठी नेत्यांनी पावले उचलण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
एकूण 80 सोसायट्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. बेळगाव तालुक्यातील 55 ते 60 सोसायट्या या मराठी भाषिकांच्या होत्या. मात्र आता या सोसायट्यांवर ही राष्ट्रीय पक्षांचे झेंडे लागू लागल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नेत्यांची बडबड करण्यापेक्षा कार्यरत असण्याची गरज व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील एक मुख्य सोसायटी म्हणून कृषी पत्तीनकडे पाहिले जाते. मात्र आता या निवडणुका जाहीर होणार असून त्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे आहे.