राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिन नुसार आज जिल्ह्यात २४४ नवे रुग्ण आढळले आहेत.
यासोबतच आज एकूण ६०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आजच्या वाढीव कोरोना रुग्णांच्या संख्येसह एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५८५० वर गेली आहे. तर एकूण कोरोनमुक्त रुग्णांची संख्या १२०५२ वर जाऊन पोहोचली आहे.
याशिवाय ३५६३ रुग्ण अजूनही उपचार घेत असून रजिल्ह्यात एकूण ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आजपर्यंत एकूण २३५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
आज संपूर्ण राज्यात रॅपिड अँटिन्जन टेस्ट २८३५० इतक्या झाल्या असून आरटीपीसीआर अंतर्गत ३६३१९ जणांची चाचणी घेण्यात आली आहे. म्हणजेचज आज संपूर्ण राज्यात ६४६६९ जणांची चाचणी घेण्यात आली आहे.