डॉक्टरकडे उपचारासाठी आलेल्या एका युवकाचा दोन मजली इमारती वरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात दुपारी बाराच्या दरम्यान घडली आहे. रोहन राजेश कुपेकर वय २५ रा. हिंडलगा असे या मयत युवकाचे नाव आहे.
हुतात्मा चौकातील आर के आर्केड इथल्या डॉक्टरकडे तो उपचार करून घेण्यासाठी आपल्या वडिलांसोबत आला होता गॅलरी मधील रिलिंग मधून तोल गेल्याने तो खाली पडला त्यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यात त्याचा घटना स्थळीच मृत्यू झाला.
घटना स्थळावरून समजलेल्या माहिती नुसार रोहन याला फिट्स चा त्रास होता अचानक त्याला फिट्स आले व तोल गेल्या तो दोन जालॆ इमारतीवरून खाली कोसळला त्यातच त्याचा अंत झाला. त्याच्या वडिलांच्या समोरच त्याने जीव सोडला या घटनेने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान खडे बाजार पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मयत रोहन हा हिंडलगा गावचा रहिवाशी असून त्याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी खडे बाजार पोलीस अधिकी तपास करत आहेत
Trending Now