Sunday, January 12, 2025

/

येळ्ळूर अरवाळी धरणामध्ये उडी घेऊन युवतीची आत्महत्या

 belgaum

येळ्ळूर (ता. बेळगांव) येथील अरवाळी धरणामध्ये उडी घेऊन एका युवतीने आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येळ्ळूर (ता. बेळगांव) येथील अरवाळी धरणाच्या ठिकाणी आज शनिवारी दुपारी एक युवती केए 22 एचबी 2904 या क्रमांकाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून गेली होती. त्यानंतर आपली दुचाकी डॅमकडे पार्क करून धरणाकडे जाऊन पाण्यात उडी घेतली असे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले. पार्क केलेल्या दुचाकींची डिकी तोडून मोबाईल ताब्यात घेण्यात आला. सदर मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर तिचे नातेवाईक तेथे आले व ही आमचीच दुचाकी असे म्हणून आक्रोश केला. सायंकाळी उशीरापर्यंत मृतदेह धरणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

सदर युवती वडगांव भागातील असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून धरणामध्ये मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. आत्महत्या करणारे युवती कोण होती? आणि तिच्या आत्महत्येचे कारण काय? हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.

दरम्यान, एका युवतीने अरवाळी धरणात उडी टाकून आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी येळ्ळूर परिसरात पसरली. त्यामुळे धरण परिसरात बघ्यांची देखील गर्दी वाढत आहे. नेमकी घटना काय आहे ते मृतदेह मिळाल्यावर स्पष्ट होणार आहे.

View this post on Instagram

येळ्ळूर अरवाळी धरणामध्ये वडगाव भागातील युवतीची उडी घेऊन युवतीची आत्महत्या? सदर युवती दुचाकी घेऊन धरणाकडे आली तिने गाडी पार्क केलो थेट धरणात उडी घेतली अशी माहिती काही प्रत्यक्ष दर्शीनी पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोध सुरू आहे.सदर युवतीने पिवळा ड्रेस घातला होता अशीही माहिती मिळाली आहे.ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

A post shared by Belgaum live (@belgaumliveofficial) on

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.