केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 2019 साली घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये प्रदीप सिंग देशात पहिला आणि अभिषेक सराफ महाराष्ट्रात प्रथम आला आहे. विशेष म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत स्पृहणीय हे यश संपादन केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये बेळगाव जिल्ह्यातील आनंद कलादगी 446 वा क्रमांक, प्रफुल्ल देसाई 532 वा , गजानन बाळे 663 वा आणि चिक्कोडीच्या प्रियांका कांबळे हिने 670 वा क्रमांक पटकाविला आहे. उपरोक्त परीक्षेत देश पातळीवर प्रतिभा वर्मा ही विद्यार्थिनी तिसऱ्या क्रमांकावर असून महिला उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
नागरी सेवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 829 उमेदवारांची विविध नागरी सेवेसाठी निवड करण्यात आली आहे. या 829 उमेदवारांपैकी 304 उमेदवार जनरल कॅटेगिरी, 78 ईडब्ल्यूएस, 251 ओबीसी, 129 एससी आणि 67 एसटी गटाचे आहेत.
चारही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचे अभिनंदन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी एका पत्रका द्वारा केल आहे
दरम्यान, उपरोक्त परीक्षेतील यशाबद्दल बेळगाव जिल्ह्यातील आनंद कलादगी, प्रफुल्ल देसाई, गजानन बाळे आणि चिक्कोडीच्या प्रियांका कांबळे जगदीश अदहळळी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.