काल बेळगाव तालुक्यातील काकाकती या गावात तरुणांच्या दोन गटात हाणामारी होऊन या हाणामारीचे पर्यवसान खुनात झाले आहे. सल्लाउद्दीन नजीरसाबा पकाली (वय ३२, रा. मुस्लिम गल्ली, काकती) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या व्यक्तीवर चाकूने हल्ला करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, काल रात्री 12 च्या दरम्यान येथील आंबेडकर गल्ली येथे राहणारे अमर शाम मेत्री आणि अखिल शिवाप्पा मेत्री यांच्यासह जवळपास पाच युवकांचा समूह भांडणाच्या उद्देशाने गेले होते.
या दरम्यान वाद विकोपाला जाऊन वादाचे पर्यवसन हाणामारीत आणि हाणामारीचे पर्यवसन खुनात झाले. अमर शाम मेत्री आणि अखिल शिवाप्पा मेत्री यांनी सल्लाउद्दीन नजीरसाबा पकाली या तरुणावर चाकूने वार केला. या युवकाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी काकती पोलीस स्थानकाचे पीआय आर. हळ्ळूर, पीएसआय अविनाश यरगोप्प आणि सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अमर शाम मेत्री आणि अखिल शिवाप्पा मेत्री या दोघांना अटक केली असून यामध्ये सामील असलेल्या अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.