पावसाळा आला की अनेकांना चिंता लागते ती वीज कपातीची. मात्र हाच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या जिवावर उदार होऊन वीज महामंडळाचे कर्मचारी काम करत असतात.
आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी ते धडपडत असतात. अशीच घटना नुकतीच शहापूर परिसरात घडली आहे. भर पावसात नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत मिळावा यासाठी त्यांचे हे प्रयत्न अभिनंदनास पात्र आहेत.
भरपावसात सुद्धा सामान्य जनतेच्या हाकेला ओ देऊन प्रसंगी स्वतःच्या जीवाची तमा न करता प्रभागातील विजेसंबंधीतच्या तक्रारी दूर करणारे हेस्कामचे शहापूर विभागाचे कर्मचारी बी जी देसाई मेस्त्री, इजाझ सनदी, शिवा बडगांवी, वाय पी कोले, सेक्शन आँफीसर प्रविन बरगाळी व स्टेशन इनचार्ज बेळ्ळीकट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कर्मचाऱ्यासह खरच या कोरोनाला न घाबरता अविरत सेवा देत आहेत.
तसेच शास्त्रीनगर परिसरातील आठवड्यापासून असलेला मिणमिणत लागणाऱ्या स्ट्रीट लाईटचा प्राब्लेम विक्रम उडगल्ली (श्री एंटरप्रायजीस) यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जी, संगम मडीवाल व रवी यांच्या टीमने सोडविला आहे. त्याबद्दल शास्त्रीनगर रहिवाश्यांमार्फत गोपाल पाटील, विनय गुरव, राजू कदम, माई पाटील, नारायण मालवदे, हेमंत पाटील, महेश बामणे, जोतिबा चौगुले, पवन जुवेकर यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यांच्या सेवेबद्दल या कोरोना योध्यांचे आभार मानावे तेवढे कमीच् आहे असे राहुल पाटील यांनी शास्त्रीनगरवासीयांतर्फे संबंधित विभागाला व वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले. भर पावसातही आपली सेवा बजावून त्यांनी आपल्या कामाची पोचपावती दिली आहे त्यांच्या या कार्याबद्दल अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.