गेले दोन दिवस होत तिलारी आणि राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पडत असलेल्या पावसाने राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे.
त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी सायंकाळी ६ वाजता जलाशयाचे दरवाजे ५ दरवाजे एकेक फुटांनी उघडण्यात आले आहेत. राकसकोप जलाशयाच्या पत्रामध्ये येणाऱ्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे .पावसाचा जोर अखंडपणे सुरू असल्यामुळे मार्कंडेय नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. धरणाच्या क्षमतेपेक्षा येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अधिक आहे.
बेळगाव शहराला पिण्याच पाणी पुरवणाऱ्या राकसकोप जलाशय मागील वर्षी ३० जुलै २०१९ रोजी पाहिलांदा ओव्हरफ्लो झाले होते यावेळी सादर धरण ओव्हर फ्लो होण्यस सात दिवसांचा म्हणजे एक आठवडा उशीर झाला आहे.

राकस्कोप जलाशय तुडुंब झाल्याने बेळगाव शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्याची समस्याच सुटली म्हणायला काहीच हरकत नाही राकसकोप जलाशयाची क्षमता २४८२.०० इतकी आहे सध्या डॅम २४७७.६० इतके भरले आहे जलाशय तुडुंब झाल्याने पाच गेट उघडण्यात आले आहेत.
मार्कडेय नदीतून ९०५० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे मार्कंडेय नदीला पूर आला आहे. कंग्राळी खुर्द या परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे पावसाने उघडीप द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र अजूनही पावसाचा जोर सुरूच आहे. अधून मधून मोठ्या सरी कोसळत असल्याने शेतकर्यांची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.