बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरल्याने या जलाशयाचे पाच दरवाजाने दोन फुटांनी उघडण्यात आले आहेत परिणामी अतिरिक्त पाण्याचा स्तोत्र वाढल्याने मार्कंडेय नदीकाठची विशेषतः बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. सध्या या भागात भाताची अन्य पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून मागील वर्षी प्रमाणेच हजारो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे.
मार्कंडेय नदीकाठ परिसरात मोठ्या प्रमाणात महापूर आला आहे. मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सुमारे हजारो एकर जमीन पाण्याखाली आली असून या जमिनीतील भात पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत. परिणामी जर असाच पाऊस सुरू राहिला तर भात पीक कुजण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्यातरी शेतकरी पाऊस जाऊ दे रे बाबा अशीच मागणी करू लागले आहेत.
मार्कंडेय नदीकाठ परिसरात कल्लेहोल उचगाव आंबेवाडी कडोली जाफरवाडी काकती होनगा देवगिरी यासह आदी भागातील भात जमीन आहे. या जमिनीतील भात पीक धोक्यात आले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मार्कंडे नदीला पूर आला आहे. नदीकाठची जमीन पाण्याखाली गेली असून या मधील भात पीक कुजण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता पावसाने विश्रांती घेतल्यास सोयीचे ठरणार आहे. याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
मागील वर्षीही झालेल्या जोरदार पावसामुळे महापूर आला होता. त्यामुळे नदीकाठ परिसरातील भात पीक कुजले होते. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जर पावसाने विश्रांती घेतली नाही तर भात पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. शेकडो एकर मधील भात पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.