बेळगाव तालुक्यातील एकाच गावातील दोन मंदिरात चोरी झाल्याची घटना मारिहाळ पोलीस स्थानक कार्यक्षेत्रात घडली आहे. मोदगा गावातील दोन मंदिरात चोरी करून चोरट्यानी 55 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
लक्ष्मी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यानी दागिने लंपास केले तर सिद्धेश्वर मन्दिरातील देणगी पेटीच पळवली आहे.
दोन्ही मंदिरात चोरी झाल्याची फिर्याद मंदिराच्या पुजाऱ्यानी केली आहे.गेल्या आठवड्यात बेळगाव जवळील येळ्ळूर मधील लक्ष्मी मन्दिर फोडून ऐवज लंपास केला होता त्या नंतर मोदगा येथील मन्दिर लक्ष झाली आहेत.
चोरट्यानी बेळगाव तालुक्यातील विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मंदिरांना लक्ष केलं आहे त्यामुळे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.