बेळगाव शहरातील उपनोंदणी अर्थात सब रजिस्ट्रार कार्यालय आठवड्यात दुसऱ्यांदा टाळे लागले आहे . मागील आठवड्यात हे कार्यालय तीन दिवसासाठी कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाचा कार्यालयात वावर झाल्याने सील डाऊन करण्यात आले होते सोमवारी या कार्यालयातील कर्मचारी पॉजिटीव्ह आल्याने दुसऱ्यांदा हे कार्यालय बंद झाले आहे.
बेळगाव शहरात या अगोदर महापालिका हेस्कॉम अशी कार्यालये बंद झाली होती त्यात सब रजिस्ट्रार कार्यालयाचा देखील समावेश झाला आहे. दोन कर्मचारी पॉजिटीव्ह आल्याने कार्यालय तर बंद झालेच आहे या शिवाय पॉजिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले सर्व कर्मचारी देखील होम कवारंटाइन झाले आहेत.
बेळगाव शहरात मनपा आणि सब रजिस्ट्रार आणि तहसीलदार या शासकीय कार्यालयातून नागरिकांची गर्दी होत असते अनेकदा सोशल डिस्टन्सचा फज्जा या कार्यालयातून उडालेल्या बातम्या आपण वाचल्या आहेत त्यातच कर्मचारी पॉजिटीव्ह आल्याने आठवड्यात दुसऱ्यांदा हे कार्यालय बंद झाले आहे. एक महिला आणि एक पुरुष पॉजिटीव्ह आले आहेत त्यामुळे हे कार्यालय बंद झाले आहे